महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवात, रोज एक हजार थाळ्यांचे नियोजन - आमदार रणजित कांबळे

शिवभोजन केंद्र आता जिल्ह्यातील इतर भागातसुद्धा सुरू करण्यात आले. या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी यांची शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे.जिल्ह्यात एक हजार शिवभोजन थाळींचे वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.

पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवात
पुलगावमध्ये शिवभोजन थाळीपुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवातला सुरुवात

By

Published : Apr 9, 2020, 8:22 AM IST

वर्धा- कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कोणाला जेवणाची अडचण होऊ नये, यासाठी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरू असलेले शिवभोजन केंद्र आता जिल्ह्यातील इतर भागातसुद्धा सुरू करण्यात आले. या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थी यांची शिवभोजनच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे.

याच धर्तीवर पुलगाव येथे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री तथा आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात केवळ 5 रुपयांत ही थाळी मिळणार आहे.

पुलगावमध्ये शिवभोजन थाळीला सुरुवात

जिल्ह्यात एक हजार शिवभोजन थाळींचे वितरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे. यावेळी आमदार कांबळे, देवळी तहसीलदार राजेश सरोदे, पुलंगाव शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर, रमेश सावरकर यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details