महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्याच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

आर्वी तालुक्यातील खरांगणा मोरंगणा या गावातील आर्मीमध्ये कार्यरत जवानाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मूळगावातील हुतात्मा स्मारक येथे रविवारी सकाळी शासकीय इतमात जवानावर अंत्यसंस्कार होणार आहे. भूषण सुनीलराव दांडेकर असे जवानाचे नाव आहे.

शहीद भूषण दांडेकर
शहीद भूषण दांडेकर

By

Published : Feb 23, 2020, 1:43 AM IST

Updated : Feb 23, 2020, 9:39 AM IST

वर्धा -आर्वी तालुक्यातील खरांगणा-मोरांगणा या गावातील आर्मीमध्ये कार्यरत जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मूळगावातील हुतात्मा स्मारक येथे सकाळी शासकीय इतमामात जवानावर अंत्यसंस्कार होणार आहे. भूषण सुनीलराव दांडेकर असे जवानाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

भूषण हा सोळा मराठा बटालीयनमध्ये कार्यरत होते. 13 फेब्रुवारीला भूषण दांडेकर कुपवाडा येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा धक्का बसला आणि ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तत्काळ सहकाऱ्यांनी बेळगाव रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने गुरुवारी 20 फेब्रुवारीला त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. येथील डॉक्टरांनी केले. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

भूषण दांडेकर सुरूवातीपासून आर्मीमध्ये जाण्यास इच्छुक होते. सन 2011 मध्ये ते सेवेत रुजू झाले. मागील 9 वर्षापासून ते सैन्यदलात कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्याने पत्नी, आईवडील भाऊ सर्वांनाच धक्का बसला आहे. यासह गावातही शोककळा पसरली आहे. कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार हा गावातील शहिद स्मारक परिसरात करावा, असा तो मित्रांना बोलून दाखवत असे. यामुळे त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. यावेळी खरांगणा पोलीस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहतील असे सांगितले जात आहे.

Last Updated : Feb 23, 2020, 9:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details