महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 6, 2020, 10:01 AM IST

Updated : Feb 6, 2020, 10:27 AM IST

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात आज सर्वपक्षीय बंद, शाळांना सुट्टी

हिंगणघाट जळीतकांडानिषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. यामध्ये शाळांनीही सहभाग नोंदविला असून पालकांनी मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

शाळा बंद असल्याने परत जाताना पालक
शाळा बंद असल्याने परत जाताना पालक

वर्धा- हिंगणघाट जळीत कांडाच्या निषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. हा मोर्चा शिवाजी चौकातून सकाळी 11 वाजता निघणार आहे. या बंदला पालकांचा प्रतिसाद आहे. पालकही या बंदला समर्थन करत आहेत. यामध्ये शाळांनीही पूर्व कल्पना न देता बंदमध्ये सहभाग नोंदवला. पालकही मोर्चात सहभागी होणार आहेत.

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्धा बंद

सकाळी लवकर उठून आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी गेले. पण, अचानक शाळेला सुट्टी असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितल्याने त्यांना आल्या पाऊली पर जावे लागले. याबाबात पालक भावना व्यक्त करताना म्हणाले, आम्ही बंद मध्ये सहभागी होणार आहे. सर्वांनी सहभागी व्हा असे, आवाहनही केले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीलाही तशाच प्रकारच्या यातना देऊन फाशी द्या'

Last Updated : Feb 6, 2020, 10:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details