वर्धा - इंग्रजी वैश्विक भाषा असली तरी मराठी भाषेविषयी न्यूनगंड बाळगू नये. मराठी ही संवादाची, आत्म संवादाची भाषा आहे. मात्र, आज सोशल मीडियावर भाषेची तोडमोड भविष्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्रदर्शन कारी कला विभागाचे प्रभारी प्रमुख आणि नाटककार डॉ. सतीश पावडे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील सेलू येथील यशवंत महाविद्यालयाच्यावतीने आयोजित 'मराठी भाषा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य' या विषयावर ते बोलत होते.
सोशल मीडियावरील भाषेची तोडमोड चिंतेचा विषय - डॉ. सतीश पावडे
आज सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर कमीत कमी शब्द वापरून मराठी भाषेची खिचडी करून ठेवलेली आहे. इंग्रजीच्या नावाने कमीत कमी शब्द वापरत लिखाण होत आहे. हे मराठी भाषेचे नवीन रूप उदयाला येत आहे. भविष्यासाठी ही चिंतेची बाब आहे. इंग्रजीबरोबर मराठीत वाचन लिखाण केले पाहिजे.
नाटककार डॉ. सतीश पावडे
आज सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मवर कमीत कमी शब्द वापरून मराठी भाषेची खिचडी करून ठेवलेली आहे. इंग्रजीच्या नावाने कमीत कमी शब्द वापरत लिखाण होत आहे. हे मराठी भाषेचे नवीन रूप उदयाला येत आहे. भविष्यासाठी ही चिंतेची बाब आहे. इंग्रजीबरोबर मराठीत वाचन लिखाण केले पाहिजे. आजच्या काळात शुद्ध मराठी टिकून ठेवणे हे मोठे आव्हान असेल, असेही पावडे म्हणाले. यावेळी डॉ. अजय हुमणे आणि डॉ. राजेंद्र मुंडे आदींची उपस्थिती होती.