वर्धा -देवळी मतदारसंघाचा इतिहास पाहता काँग्रेसच्या पाठीशी राहणार मतदार आहे. यापूर्वी काँग्रेसला दिवंगत प्रभाताई राव नंतर दहाव्यांदा तर माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांना सलग पाचव्यांदा विजय मिळाला. विशेष म्हणजे जुने रेकॉर्डमोडत यंदा 35 हजार मताधिक्याने सेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा पराभव केला. पक्षांतर करणाऱ्या जनता माफ करत नाही, म्हणत रणजित कांबळे यांनी विरोधकाला टोला लगावला.
मतदार जागृत झाला आहे. सत्तेसाठी जे लोक इकडून तिकडे जातात त्यांना पाठिंबा देत नाही. जे 24 लोक काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत गेले त्यातले 19 उमेदवार पराभूत झाले. जनता इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांना माफ करत नाही. विशेष म्हणजे कांबळे यांच्या विरोधात असणारे उमेदवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी आमदारकी लढवण्यासाठी सुरुवातीला भाजपमध्ये प्रयत्न केला. नंतर शिवसेनेत गेले, आमदारकीची तिकीट मिळवली. पण दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता न आल्यान तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
मोदी लाटेतही गड टिकवला, यंदाही मतांची मुसंडी -