वर्धा - शनिवारी सगळीकडेच रामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगव्या पताकांनी वर्धा शहर सजवले गेले आणि सगळीकडेच जय श्रीरामचा गजर ऐकायला मिळाला. वर्ध्यातील बाजार चौकातील श्रीराम मंदिरातून खासदार रामदास तडस यांच्या हस्ते भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली.
वर्धा नगरी श्रीरामाच्या गजरात दुमदुमली, चित्रफितीतून पाणी वाचवण्याचा संदेश
मागील काही दिवसंपासून वर्ध्यातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. यामुळे पाण्याअभावीचे येत्या काळातील संकट आणि पाण्याचे महत्त्व चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले
यावेळी सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी लोकांनी गर्दी केली होती. शोभायात्रेमध्ये नयनरम्य देखावे सादर करण्यात आले. संपूर्ण वर्धा शहरात शोभायात्रेच्या स्वागताकरिता भगव्या रंगाच्या पताका श्रीराम लिहून उंचीवर लावण्यात आल्या. यासोबतच ठिकठिकाणी लंगर प्रसादाचे आयोजन विविध संघटनांनाच्यावतीने करण्यात आले.
मागील काही दिवसंपासून वर्ध्यातील नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. यामुळे पाण्याअभावीचे येत्या काळातील संकट आणि पाण्याचे महत्त्व चित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. जिथे पाणी नाही तिथे काय हाल होतात हे दाखवणारे भयावह चित्र दाखवत जनजागृती करण्यात आली. आताच पाणी जपून वापरले नाही तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल, असा संदेश देण्याचे काम समाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले.