वर्धा -वर्ध्यात आजपासून लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे 5 वाजतापासून नागरिकांनी नंबर लावण्यासाठी लसीकरण केंद्र गाठल्याने मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. यामध्ये वर्धा शहरात 4 केंद्रावर कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्याची सोय करण्यात आली आहे. पण, रांगेत उभे राहताना जेष्ठ नागरिकांची मात्र फरफट होताना दिसून येत आहे. केंद्रावरील असुविधांमुळे लसीकरणासाठी आलेल्यांमधून संताप व्यक्त होत आहे. वर्ध्यात आतापर्यंत 1 लाख 50 हजारांवर लोकांनी पहिला डोस घेतला आहे.
लसीकरण केंद्रावरील गर्दीचे दृश्य हेही वाचा -तहसीलदारांच्या दालनापुढे फळे टाकून विक्रेत्यांनी मांडल्या व्यथा
मागील काही दिवसांत मुबलक प्रमाणात वॅक्सिन मिळाले नाही. आता वॅक्सिन उपलब्ध झाले असून यामुळे लाभार्थ्यांसाठी चार केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. याचा परिणाम म्हणून आज पहाटेपासून केंद्रांवर टोकण मिळवण्यासाठी मोठी गर्दी झाली.
प्रशासनाने लस पुरवठ्याप्रमाणे शहरात आता एका दिवशी 300 जणांना टोकण देण्याचा निर्णय घेतला आहे. यात चार केंद्रांवरचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. यावर फोन करून नोंदणी आणि वेळ घ्यावी लगणर आहे. यामुळे सकाळपासून केंद्रावर गर्दी होणार नाही. शिवाय टोकनसोबत वेळ दिली जाणार असून त्याच वेळेत केंद्रावर पोहचनार असल्याने गर्दीला आळा बसणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी विपिन पालिवाल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. पण, यात ज्यांचे फोन लागणार नाही किंवा त्या दिवशी नंबर लागणार नाही, त्यांची ओरड निर्माण झाली आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी लसीकरणाला गर्दी केली जात आहे, यामुळे नंबर लावण्याच्या गर्दीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा -आर्वी तहसीलच्या रेकॉर्ड रुमला भीषण आग; आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू