वर्धा - कोरोनाच्या लढ्यात आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहेत. दिवसभर सेवा देणारे पोलीस कर्मचारी अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेकरीत पोलीस व्हॅनमध्येच सिंचन साहित्याचा उपयोग करून निर्जंतुकीकरण करण्यासाठी अवघ्या साडे आठ हजारात हा जुगाड तयार करण्यात आला आहे. पोलीस विभागाच्या मोटर वाहन विभागाने केलेला हा जुगाड सध्या पोलिसांना संरक्षण करत आहे.
पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड - वर्धा पोलीस
सॅनिटायझर युनिट बनवताना अगदी सहज आणि स्वतःतात बनवण्यात आले आहे. यासाठी देसी जुगाड म्हणजेच शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे पाईप आणि सॅनिटायझर फवारणीसाठी नोजल उपयोगात आणले आहे.
पोलीस व्हॅन बनली 'सॅनिटायझर व्हॅन'; वर्ध्याच्या पोलिसांचं देसी जुगाड
सर्वत्र सेवा देताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा. कोणालाही बाधा होऊ नये. याशिवाय कर्तव्य बजावताना संरक्षण व्हावे म्हणून, सकाळी आणि सायंकाळी या सॅनिटायझर व्हॅनच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करून त्यांना सुरक्षा कवच प्रदान केले जात आहे.
Last Updated : Apr 10, 2020, 7:41 PM IST