वर्धा - महात्मा गांधी आणि विनोबाजींच्या नावाने पुनीत झालेला वर्धा आज दारूच्या अनेक प्रकरणामुळे बदनाम झाला आहे. तळेगांव येथे दारू पिऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातलेला व्हिडिओ समोर येत आहे. ज्यांनी दारू विक्रीवर कारवाई केली पाहिजे त्यांचावरच दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत असेल तर काय म्हणावे?
संदीप खंडारे हा पोलीस शिपाई असून आष्टी पोलिसात कार्यरत आहे. तो सुट्टीवर असताना दारू पिऊन तळेगांव येथील उड्डान पुलाखाली धिंगाणा घालत होता. यावेळी मद्यधुंद असल्याने त्याला काही सुचत नव्हते. सुरूवातीला मोबाईल फेकला मग खिशातील नोटा काढून फाडून टाकल्या. हा प्रकार तळेगाव येथील नागरिक भरदिवसा पाहत होते. काहींनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच शिवीगाळ करतांना दिसून आला. अखेर काहींनी ताया पोलिसाला तळेगांव पोलीस स्टेशन येथे सोडून दिले.