महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपूरला जाणारा दारूसाठा जप्त; पोलिसांनी ठोकल्या तीन आरोपींना बेड्या - समुद्रपूर

वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र तरीही या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तस्करांच्या गाडीवर टाकलेल्या छाप्यात गाडीसह ८ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

छापा मारताना पोलीस

By

Published : Jun 1, 2019, 11:38 PM IST

वर्धा- चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येणाऱ्या दारूसाठ्यावर पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली. चंद्रकांत पवार, ब्रिजेश तामगाडगे आणि संदीप सिडाम या तीन तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत पोलिसांनी कारसह 8 लाखाचा ऐवज जप्त केला आहे.

छापा मारताना पोलीस


नागपूर - चंद्रपूर मार्गावरील जाम चौरस्त्यावर पोलिसांना एका कारमध्ये विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे सापळा लावून पोलिसांनी कारची तपासणी केली. यावेळी कारमध्ये विदेशी कंपनीची १ लाख २० हजाराची दारू आढळून आली. पोलिसांनी ही दारु जप्त करत तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details