वर्धा - समुद्रपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जाम येथील बसस्थानकावर संधीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणाऱ्या 2 महिलांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे प्रगटीकरण शाखेने केली. या महिला अट्टल चोरट्या असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता समुद्रपूर पोलिसांच्या वतीने वर्तवली जात आहे. नन्नु रोहित दुनगव (वय 20) आणि मनीषा दुनगव (वय 19) (रा.नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
वर्धा: बसमधील प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या 2 महिला गजाआड
जाम बस स्थानकावर पंकज पावडे हा आपल्या कुटुंबियांसोबत हिंगणघाटला जाण्यासाठी आले होते. बसमध्ये चढत असताना 2 अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पाकीटमधील तब्बल १ लाख ६७ हजाराचे दागिने लंपास केले. याची माहिती कळताच घटनेची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्याच्या आधारावर दोन संशयित महिलांना अटक केली.
जाम बस स्थानकावर पंकज पावडे हा आपल्या कुटुंबीयांसोबत हिंगणघाटला जाण्यासाठी आले होते. बसमध्ये चढत असताना २ अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पाकीटमधील तब्बल १ लाख ६७ हजाराचे दागिने लंपास केले. याची माहिती कळताच घटनेची तक्रार समुद्रपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक पुराव्याच्या आधारावर २ संशयित महिलांना अटक केली. नागपूरच्या रिंग रोड टोली रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या नन्नु रोहित दुनगव (वय 20) आणि मनीषा दुनगव (वय 19) दोघींना अटक केली. तपासात गुन्ह्याची कबुली देत पोलिसांनी या महिलांकडून चोरीला गेलेले ६ तोळे ७ ग्राम वजनाचे १ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने जप्त केले.
गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख अरविंद येनूरकर यांना तपासात हिंगणघाट येथील २ चोऱ्या उघडकीस आणण्यात यश आले आहे. आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारवाई एसडीपीओ भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे यांची गुन्हे प्रगटीकरण पथक प्रमुख अरविंद येनूरकर, सहकारी रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे महिला पोलीस कर्मचारी रंजना झिलपे यांनी ही कारवाई पूर्ण केली.