वर्धा - जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांनी सदर शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक करत कायदेशीररित्या पोलीस कोठडी मिळवली. मात्र, आता याच प्रकरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही एक पाऊल उचलत त्या शिक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्याची करवाई केली.
शाळकरी मुलींवर अत्याचार प्रकरणी 'त्या' दोषी शिक्षकावर बडतर्फीची कारवाई
सिंदी (रेल्वे) पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली होती. सिंदी रेल्वे पोलिसांनी या नराधम शिक्षकावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. सतीश बाजाईत असे बडतर्फ केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
हेही वाचा...कोणाच्या विश्वासावर मुलांना शाळेत पाठवायचे? शिक्षकाचा विद्यार्थीनिंवर अत्याचार
सिंदी रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत या शिक्षकावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने असे वर्तन पाहता हे मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे आहे. यामुळे अशा प्रकारचे कृत्य कोणीही करू नये. यासाठी केवळ काही काळापुरते निलंबन न करता त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.