महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार - गुन्हा

अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा मुलींच्या आणि अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या मुलांवर अत्याचार करत होता.

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

By

Published : Jul 27, 2019, 6:02 PM IST

वर्धा- शहरातील एका अल्पवयीन मुलाने 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा अश्लिल कृत्य करताना आजीला दिसल्यामुळे सदर घटना उघड झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

याबाबत अधिक माहिती अशी, की अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा मुलींच्या आणि अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या मुलांवर अत्याचार करत होता. त्यानंतर एके दिवशी हा प्रकार मुलाच्या आजीने पाहिल्यामुळे ही धक्कादायक घटना उजेडात आली.

या अल्पवयीन 17 वर्षीय मुलाने लैंगिक माहिती सांगून मुलावर अत्याचार केला. त्याप्रमाणचे त्याने घरात कोणी नसताना इतर 3 मुलींवरही अत्याचार केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात रामनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू असून यामध्ये आणखी किती जणांवर अत्याचार करण्यात आला आहे, हे तपासात समोर येणार आहे. मात्र, या प्रकारावरून मुलांना शालेय लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details