वर्धा- राष्ट्रीय महामार्गावर वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर रात्री खांबडा शिवारात एक दुचाकीस्वाराची बैलगाडीबरोबर समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. अश्विन पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सुशील कडू असे जखमीचे नाव आहे. दोघेही वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुरपाड येथील रहिवासी आहेत.
वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर दुचाकीची बैलगाडीला समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू - पोलीस
राष्ट्रीय महामार्गावर वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर रात्री खांबडा शिवारात एक दुचाकीस्वाराची बैलगाडीबरोबर समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
मृत अश्विन आणि त्याचा मित्र सुशील हे दोघेही वरोऱ्याकडून सेलू मुरपाड गावाकडे निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर अंधार असल्याने अश्विनला आपल्या समोरील बैलगाडी दिसली नाही. त्याच्या दुचाकीची भरधाव वेगात बैलगाडीला समोरासमोर धडक झाली. या धडकेत अश्विनचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र सुशील गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर मृत अश्विनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.