वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील सगुणा कंपनीजवळ वाळू भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. या अपघाताप्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वर्ध्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
निलेश उमाटे (वय 40) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर प्रतिभा उमाटे (वय 35) या जखमी झाल्या आहेत.
निलेश उमाटे (वय 40) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर प्रतिभा उमाटे (वय 35) या जखमी झाल्या आहेत. हे पती-पत्नी पवनार येथून मोटरसायकलने दारोडा गावाकडे येत होते. त्यावेळी वाळूने भरलेल्या (MH-31-CB-9858) ट्रकने या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दुचाकी ट्रकखाली आली. यामध्ये निलेश उमाटे आणि प्रतिभा गंभीर जखमी झाले. दोघांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, निलेश यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्रामला नेत असताना वाटेतच निलेश यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील वाळू घाटावर वाहतूक करणाऱ्या ट्रकची गती वाढलेली आहे. अवैधरित्या चालणाऱ्या या वाहतुकीमुळे अपघातातील मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षातली ही तिसरी घटना आहे.