वर्धा- पुलगाव ते वर्ध्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला असून यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना नागपूर मुंबई महामार्गावर मलकापूर बोदडपासून काही अंतरावर गुरुवारच्या रात्री घडली. धडक इतकी जबर होती की, गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. शफी लतीफ शाह असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूरचे रहवासी आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत कारचालकाचा मृत्यू; दोघे गंभीर - जखमी
शफी लतीफ शाह असे मृतकाचे नाव असून ते चंद्रपूरचे रहिवासी आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा येथील ईश्वर बोरकर, राम अपैय्या हे कारचालक शफी लतीफ शाहसोबत पुलगावमार्गे अमरावतीला गेले होते. काम आटोपून चंद्रपूरकडे परत जाताना अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. यात चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला गेली. यात कारचालक शफी लतीफ शाह यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पुलगाव पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. जखमींना गाडीच्या बाहेर काढून उपचारासाठी रवाना करण्यात आले असून मृतकाचे शव पुलगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे.