महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवनीत राणासाठी पदाधिकाऱ्यांचे मंदिरात साकडे; आर्वी ते अमरावती पायदळ वारी

लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणांसाठी पदाधिकाऱ्यांचे मंदिरात साकडे.... युवा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी काढली पायदळ वारी... एकवीरा मंदिरात सोडणार नवनीत राणांच्या विजयाचा संकल्प...

नवनीत राणासाठी पदाधिकाऱ्यांचे मंदिरात साकडं

By

Published : Mar 24, 2019, 9:50 AM IST


वर्धा - सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशातच आपल्या नेत्यासाठी कार्यकर्ते नवनवीन भन्नाट संकल्पनांचा वापर करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे आर्वीतील युवा स्वाभिमानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क मंदिरात जाऊन साकडे घातले आहे. या कार्यकर्त्यांनी अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी आर्वी ते अमरावतीपर्यंत चक्क पायदळ वारी काढत एकवीरा देवीला साकडे घातले आहे.

नवनीत राणासाठी पदाधिकाऱ्यांचे मंदिरात साकडं

मंदिरात जाऊन साकडे घालणे हे जरी नवीन नसले तरी आर्वी ते अमरावती पायदळ प्रवास करत हे साकडे घालण्याच्या प्रकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाढते तापमान पाहता पायदळ वारी काढत आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी अग्रपूजाधरी गणपती मंदिरात जाऊन पदयात्रेला सुरुवात केली. त्यानंतर शहरातील अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मंदिर स्थळी भेट दिली. विशेष म्हणजे यात संविधान लिहणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले.

गणेश मंदिरापासून सुरुवात झालेल्या ही पदयात्रा अमरावतीचे ग्रामदैवत एकविरा देवीच्या मंदिरात पोहोचल्यानंतर कार्यकर्ते या ठिकाणी संकल्प सोडणार आहेत. सुमारे ६० किमी प्रवास करणारे युवा स्वाभिमानाचे पदाधिकारी एकवीरा मंदिरात लोटांगण घालून हा संकल्प सोडणार आहेत. युवा स्वाभिमानाच्या नवनीत राणा आणि सेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या कारणांमुळे अनेकदा चर्चेत असणाऱ्या नवनीत राणा या पदाधिकाऱ्यांमुळे चर्चेच्या विषय ठरत आहे. पदयात्रेत दिलीप पोटफोडे यांच्यासह कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर, बादल काळे, निखिल वानखडे, सुरज मेश्राम सिद्धांत कळंबे आदींनी पायदळ वारी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details