वर्धा - विज्ञान हा केवळ पुस्तक वाचून शिकण्याचा विषय नाही. तर प्रत्यक्षात प्रयोगाद्वारे शिकण्याचा विषय आहे. याच संकल्पनेवर आधारित शिक्षण देत मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी वाढवण्याचे काम वर्ध्यातील गांधी ज्ञान मंदिर परिसरातील बजाज विज्ञान केंद्रात होत आहे. मागील अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
हेही वाचा...निष्ठेला सलाम ! आठ महिन्याच्या गर्भवती असूनही नमिता मुंदडा मतदार संघाच्या प्रश्नांसाठी विधानसभेत
लहान मुलांना लहान वयात येणारे प्रश्न भन्नाट असतात. पण त्यांच्या त्या प्रश्नांचे निराकरण योग्य पद्धतीने न झाल्यास कायमस्वरूपी चुकीची माहिती त्यांच्या मनात बिंबवली जाते. त्यामुळे त्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे निराकरण योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रश्नांना जर प्रयोगातून उत्तरे दिली, तर रोजच्या जीवनातील विज्ञान त्यांना कळायला लागते. यातूनच प्रश्न पडणे आणि त्याचे उत्तर शोधणे यातून विज्ञानाची आवड निर्माण होते. बजाज विज्ञान केंद्रात देखील अशाच पद्धतीने शिकवले जाते.