वर्धा - युतीच्या जागावटपात वर्ध्यात भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. तिन्ही उमेदवारांनी एकाच दिवशी मुहूर्त साधत महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले. अर्ज भरण्याच्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
वर्ध्यात विद्यमान आमदार पंकज भोयर यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलहातून विरोध झाला होता. संघाचा सर्व्हे व्हायरल करत त्यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवण्यात आली होती. अखेर पंकज भोयर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने विरोधी चर्चांना पुर्णविराम मिळाला. मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.
हेही वाचा -रोहित पवार आहेत इतके श्रीमंत...
आर्वी मतदार संघात सुद्धा अनेक दिवसांपासून भाजपचे माजी आमदार दादाराव केचे आणि सुधीर दिवे यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळाली. अखेर दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनीही महायुतीतील पदाधिकाऱ्यांसोबत उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार विजयराव मुळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर, युवा नेते राहुल ठाकरे, पंकज तडस, विशेष म्हणजे यात राष्ट्रवादीचे नेते दिलीप उर्फ भय्यासाहेब काळे यांचे चिरंजीव संदीप काळे हे सुद्धा दिसून आलेत. यासह अनके पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.