वर्धा- भारतात मोदी सरकार आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत मोबाईल बंदी करावी, असा जावई शोध हा जम्मू काश्मीरचे राज्यपाल आणत असतील तर तो त्यांचा विषय असू शकतो. जम्मू काश्मिरात जी परिस्थिती निर्माण करून ठेवली ती आणीबाणीपेक्षाही वाईट असल्याची टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली. ते वर्ध्यातील आर्वी येथे महापर्दाफाश यात्रेदरम्यान बोलत होते.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले- नाना पटोले - महापर्दाफाश यात्रा
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी वर्ध्यातील आर्वी येथे महापर्दाफाश यात्रेदरम्यान मोदी सरकार वर जोरदार टीकास्त्र सोडत मोदी सरकार आल्यापासून देशात हिंसाचाराचे प्रमाण वाढले असल्याचे मत व्यक्त केले. जम्मू काश्मिर मुद्यावर बोलताना ते म्हणाले की काश्मिरातील परिस्थिती आणीबाणीपेक्षाही वाईट असून तेथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे.
आपल्यात मनुष्यधर्म तो कुठल्याही जातीचा असो त्याला त्याचे स्वातंत्र्य असावे अशी व्यवस्था संविधानाने दिली आहे. सध्या जम्मू काश्मिरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. राहुल गांधी तेथे गेले आणि शिवसेनेच्या वतीने टीका करण्यात आली. ते पर्यटनासाठी तेथे गेले नाहीत असे उत्तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिले. तुम्ही माणुसकीचा धर्म सोडला आहे. काँग्रेस माणुसकीचा धर्म पाळणारा आहे. आणि म्हणून आमचे राहुल गांधी तेथे गेले. यावर अशा प्रकारची टीका दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.