नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणूक : वर्ध्यात 35 केंद्रावर 23 हजार 68 पदवीधर मतदार करणार मतदान
नागपूर पदवीधर संघाच्या निवडणुकीकरीता 1 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. वर्धा जिल्ह्यातील 23 हजार 68 मतदार हे 35 मतदान केंद्रावरुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
वर्धा - नागपूर पदवीधर संघाच्या निवडणुकीकरीता 1 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात वर्धा जिल्हयातील 3 उमेदवार रिंगणात असून एकूण 19 उमेदवार हे निवडणूक लढवत आहे. यात जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 35 मतदान केंद्र असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केली.
नागपूर पदवीधर मतदार संघात नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्हयाचा समावेश आहे. विभागीय आयुक्त हे मतदार संघाचे नोंदणी अधिकारी तर जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहे. या विभागातील सहा नोव्हेंबरला झालेल्या नोंदणीच्या आधाराप्रमाणे 23 हजार 68 मतदार हे 35 मतदान केंद्रावरुन आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती..
जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचारी याप्रमाणे 35 मतदान केंद्रावर 140 कर्मचारी कार्यरत राहतील. तसेच 5 राखीव पथकात 20 कर्मचारी असणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर 1 याप्रमाणे 35 सुक्ष्म निरिक्षक तसेच 5 राखीव असे 40 सुक्ष्म निरिक्षक मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहे.
वर्ध्यात कुठे असणार मतदान केंद्र?
आष्टी येथे तहसील कार्यालयात 2 केंद्र असणार आहे. कारंजा तहसील कार्यालय 2, आर्वी येथे गांधी विद्यालयात 3 केंद्र असणार आहे. वर्धा तालुक्यात आंजीच्या (मोठी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक केंद्र असणार आहे. एक केंद्र तालुका कृषि कार्यालय सेलू, एक नगर परिषद सिंदी (रेल्वे) असणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवाग्राम, केसरीमल कन्या शाळा येथे 3, भरत ज्ञान मंदिर येथे 3, न्यु इंग्लीश ज्यु. कॉलेजात 4, लोक महाविद्यालय- 4, देवळी तालुक्यात चंद्रशेखर आझाद नगर प्राथमिक शाळेत 2, तहसिल कार्यालयात 1, समुद्रपूर पंचायत समिती कार्यालयात 1, हिंगणघाट तालुक्यात जी.बी.एम.एम. हायस्कूल 6, असे एकूण 35 मतदान केंद्र असणार आहे.
पदवीधर मतदार केंद्रातील मतदार..
जिल्हयात 14 हजार 45 पुरुष आणि 9 हजार 20 महिला आणि 3 इतर असे एकुण 23 हजार 68 पदवीधर मतदार आहेत. आष्टी 867, कारंजा 1087, आर्वी 2003, सर्वाधिक मतदार वर्धा 12115, देवळी 2185, समुद्रपूर 870, हिंगणघाट 3941 अशी आहे.