वर्धा - उधारीचे पैसे मागूनही परत न दिल्याने झालेल्या वादात चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. शहराच्या इतवारी परिसरात सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. रुपेश खिल्लारे असे मृतकाचे नाव असून निलेश वालमांढरे असे मारेकऱ्याचे नाव आहे.
पैशाच्या उधारीतून एकाची हत्या; हत्येचा गुन्हा दाखल - wardha police
उधारीचे पैसे मागूनही परत न दिल्याने झालेल्या वादात चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली. शहराच्या इतवारी परिसरात सायंकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. रुपेश खिल्लारे असे मृतकाचे नाव असून निलेश वालमांढरे असे मारेकऱ्याचे नाव आहे.
रुपेशने निलेशकडून काही रक्कम उधार घेतली होती. पण जेव्हा रक्कम परत मागितली तेव्हा त्याने देण्यास टाळाटाळ केली. यात पैश्याच्या उसनवारीवरून वाद असताना. सोमवारी संध्याकाळी दोघांचा समोरासमोर भेट झाली. यावेळी उसनवारी पैश्याची मागणी निलेशने केली. यात शाब्दिक विषय वाढत जाऊन वाद झाला. तेवढ्यात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या निलेश रुपेश खिल्लारे यावर चाकूचे वार करून गंभीर जखमी केले. यावेळी निलेश हा घटनास्थळावरून पसार झाला. शहर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होते. परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. रुपेशला रुगणालायत नेले असताना जिल्हा समान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला.