वर्धा सेलू तालुक्यातील जुनगड येथे साडभावानेच पत्नीच्या बहणीच्या नवऱ्याची सासरच्या शेत जमिनीच्या हिस्सेवाटणीतील वादामुळे चक्क दारूत विषारी औषध टाकून हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. गुरुवारी यात दारू पिल्याने जमीनीवर कोसळल्याने रुग्णालयात मृत्यू झाला. यात सुरवातीला सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तपासात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. मोरेश्वर पिंपळे असे 34 वर्षीय मृताचे नाव आहे. तर संदीप रामदेव पिंपळे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. यात मारेकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातील दोघांनी विषारी औषध दिल्याने विजयसिंग चितोडीया, राजकुमार चितोडीया यांनाही अटक करण्यात आली.
डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलेमृत मोरेश्वर हा गुरुवारी रात्री दारूची बॉटलमधील दारू पिताच काही क्षणात जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांनी मोरेश्वरला सेवाग्राम येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी सेलू पोलिसांनी १९ रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. सेलूचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी मोरेश्वरच्या घरी जाऊन पाहणी केली. तेव्हा त्यांना दारूच्या बॉटलमधून उग्र वास येत असून त्याचा झाकणावर छिद्र दिसून आल्याने संशय बळावला.