वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कानगावमध्ये तीन भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली. यामुळे गावांतील लोक घाबरले आहेत. जिल्ह्यातच याचे केंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या भूकंपाच्या कारणांबाबत भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेशी संपर्क करून विचारणा करावी, जेणेकरून भविष्यात याबाबत उपाययोजना करता येतील, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या.
भूकंपाबद्दल भूगर्भ सर्वेक्षण संस्थेला विचारणा करा - सुनील केदार - Minor earthquake jolts in wardha
गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पालकमंत्री सुनील केदार प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. दरम्यान भूकंप झालेल्या कानगावला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. भूकंपाच्या संभाव्य कारणांची माहिती मिळाल्यास पुढील काळात उपाययोजना करता येतील. यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होईल असेही पालकमंत्री म्हणाले.
गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. दरम्यान भूकंप झालेल्या कानगावला भेट दिली. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सूचना दिल्या. भूकंपाच्या संभाव्य कारणांची माहिती मिळाल्यास पुढील काळात उपाययोजना करता येतील. यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
कानगाव परिसरातील नागरिकांनी घाबरू नये. शासन म्हणून त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी लोकांना आश्वस्त केले. तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना घरांचे काही नुकसान झाले का, याबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसीलदार श्रीराम मुंदडा, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.