वर्धा- केंद्राचे धोरण हे शेतकरी विरोधी धोरण आहे. साधे गणित आहे. ज्यावेळी कांद्याचे उत्पादन कमी होते त्यावेळी कांदा आयात करायचे असते आणि ज्यावेळी कांद्याचे उत्पादन जास्त होते, त्यावेळी कांदा निर्यात करायचा असतो. मात्र, केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्याला उद्धवस्त करण्याचे धोरण असल्याचे टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
ते वर्ध्याच्या सेवाग्राम येथे पत्रकारांशी बोलत होते. ते वर्ध्यात कॉंग्रेचे राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते.
- मराठा समाजाच्या जागा सोडून इतर भरती करावी
मराठा आरक्षणामुळे मेगा भरती पुढे ढकलली जात आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, मराठा समाजासाठी 12 टक्के जागेवर भरती न करता उर्वरीत जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू करावी.
- आरक्षणाने राजकीय पोळी भाजण्याचे काम