वर्धा : वर्धा जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर कोटेश्वर हे एक प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आहे. काशीखंड शिवपुराणामध्ये या शिवमंदिराची महती दिली आहे. लांब आकाराचे दगडी चिरे उभारून या मंदिराची बांधणी केली आहे. खोल गाभाऱ्यात घनदाट अरण्यात श्री शंकराचे प्रतीक म्हणून वालुकामय शिवलिंग आहे. हे एक भस्माचे टेकाड आहे या भस्माच्या टेकड्यावर शिवालय उभे आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या शिवमंदिरात भक्तांची मोठी रेलचेल असते.
काशीचे महत्त्व प्राप्त :मंदिराच्या परिसराभोवती योगी संन्यासांच्या अनेक समाध्या आहे वर्धा नदी आपला प्रवाह बदलून उत्तर वाहिनी झाली त्यामुळे या क्षेत्राला काशीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे तीरावर वर्धा नदीच्या पूर्वेला प्रभू श्रीराम चंद्राचे मंदिर आहे. एक योगी पुरुष मारुती महाराजांच्या समाधीसह हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात दिमाखाने उभे आहे. कोटेश्वर येथे निसर्गाने सर्व शक्ती एकवटून रमनियता वाढवली आहे. येथे आल्यावर पुन्हा पुन्हा यावे सुखाचा काही क्षण विसावा घ्यावा आपले उत्तर आयुष्य भगवंताच्या सानिध्यात घालावे अशा अनेक कल्पना येथे मनाला स्पर्श करून जातात.
क्रोधाग्नित शतपुत्र भस्म :श्री वशिष्ठ मुनीचे शतपुत्र येथील अभयारण्यात भ्रमण करीत असताना या गंगा किनारी निद्रिस्त अवस्थेत होते. हे दृश्य बघून विश्वामित्र मुनीस क्रोध आला व त्यांनी क्रोधा क्रोधाग्नित शतपुत्रास भस्म केले वशिष्ठ मुनीला ध्यान साधनेतून हा प्रकार लक्षात आला. वशिष्ठ मुनी कोटेश्वर येथे आले. दुःखी व शोकमय वशिष्ठ मुनींनी या जागेवर कोटी यज्ञ करून महान तपश्चर्या केली अशी काशीखंड शिवपुराणात माहिती आहे. उत्तर वाहिनी नदी असल्यामुळे कोटेश्वरला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. कोटेश्वर येथे रक्षा विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दुर दुरून रक्षा विसर्जनासाठी लोक येत असतात. दरवर्षी घटस्थापनेने येथे महाशिवरात्री यात्रा उत्सवाची सुरुवात होते यानंतर महाशिवरात्री व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला दहीहंडी गोपालकाला महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता होते ही परंपरा अनेक वर्षापासून निरंतर आहे.
बीड मधील हेमाडपंथी मंदिर : शहरातील 2000 हजारो वर्षापूर्वीचे हेमाडपंथी मंदिर हे महाराष्ट्राच्या वैभवात भर घालेत. या हेमाडपंथी मंदिराचे नाव कंकालेश्वर मंदिर आहे. हे मंदिर पश्चिमाभिमुख असून मुखपंडप, त्याच्यामागे अर्धमंडप आणि या मंडपाला जोडून तीन बाजूंना अंतराळयुक्त गर्भगृह असा तलविन्यास या हेमाडपंखी मंदिराचा आहे. हे मंदिर चारही बाजूंनी संपूर्ण पाण्यामध्ये मंदिर आहे आणि पाण्याची पातळी 40 ते 50 फूट खोल आहे. मंदिराच्या आजूबाजूला कुठेही विहीर नाही, हे जिवंत पाणी आहे, या मंदिराला जे पाणी आहे ते गुप्तगंगा आहे, ते पाणी गंगेवरून येते असे सांगितले जाते.
हेही वाचा :Hemadpanthi Temple Beed : खास दिवशी 'या' मंदिरात जाऊन दर्शन घ्याल तर होतील मनोकामना पूर्ण