वर्धा- जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी अवयव काढून टाकण्याचे सुमारे १ लाख प्रकरण उघडकीस येतात. रक्ताच्या गुठळ्यामुळे होणारा आजार आणि उपचारामुळे अपंगत्वाला रोखण्यासाठी ‘लव्ह युवर लिम्ब्ज’ या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. डीप-व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) जागरूकता मासच्या निमित्ताने बीडी-इंडियाने आणि स्थानिक आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने या जनजागृती कर्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
उपक्रमाच्या माध्यमातून मधुमेहाच्या रुग्णांना फूट अल्सरमुळे येणारे अपंगत्व शस्त्रक्रिया न करता रोखता येऊ शकेल याची माहिती रुगणालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. डीप-व्हेन थ्रॉम्बोसिस यालाच सामान्य भाषेत रक्ताच्या गुठळ्या म्हणून ओळखल्या जाते. यामुळे दरवर्षी १ लाख ८५ हजार रुग्णांचे अवयव काढून टाकले जातात. अवयव काढल्यामुळे अपंगत्वाला सामोरे जावे लागते. या रुग्णांमध्ये ७० टक्के रुग्ण हे मधुमेहाचे असल्याचेही पुढे आले आहे. यामुळे 'लव्ह युवर लिम्ब्ज' मध्ये जनजागृती करून या आजाराल रोखण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला एक शिबीर घेऊन त्यामध्ये रोगाची लक्षणे आणि त्यावर शस्त्रक्रिया रहित उपचाराची माहिती दिला जाणार आहे.
नुकत्याच मध्यप्रदेशातून आलेल्या रुग्णाच्या पायाला रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. त्यामुळे, त्याला पायाला वेदना होत होत्या आणि गँगरीन होण्याला सुरवात झाली होती. मात्र, एका छोट्याशा बलून आणि स्टेंटच्या माध्यमातून उपचार करत त्याचे निदान करण्यात आले असल्याचे डॉ. पंकज बनोदे यांनी सांगितले. रक्ताच्या गुठळ्याकडे होणारे दुर्लक्ष हे जगभरातील विकलांगतेच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, शिबिराच्या माध्यमातून डीव्हीटी व डायबेटिक फूट अल्सर रुग्णांवर लक्ष केंद्रित करून ‘लव्ह युवर लिम्ब्ज’ (तुमचे अवयव जपा) हा संदेश पोहोचवनार असल्याचे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. पंकज बनोदे यांनी सांगितले.
काय आहे यावर उपचार ? कशी असते लिम्ब सेल्वेज प्रक्रिया