वर्धा- कारंजा तालुक्यातील हेटी कुंडी येथे राहत्या घरात गळफास घेऊन शेतमजुराने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. आत्महत्या करण्यामागे नेमके कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. कारंजा पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला असून धनराज माणिक ईवनाते (वय ४५) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.
वर्ध्यात शेतमजुराची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - गळफास
कारंजा तालुक्यातील हेटी कुंडी येथे धनराज ईवनाते हे कुटुंबासह राहत होते. आज सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
कारंजा तालुक्यातील हेटी कुंडी येथे धनराज ईवनाते हे कुटुंबासह राहत होते. आज सकाळी घरात कोणी नसताना गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती पोलीस पाटील रोशन बनसोड यांनी कारंजा पोलिसांना दिली असून कारांजाचे ठाणेदार राजेंद्र शेटे यांच्या मार्गदर्शन तपास सुरू आहे. ईवनाते यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शव विच्छेदनाच्या अहवाल आणि चौकशीनंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धनराज ईवनाते यांच्यामागे आई-वडील, पत्नी, तीन मुली आणि जावई असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेतून जात असल्याची चर्चा आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस तपासात काय पुढे येईल याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.