महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी

हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याच्या धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. यामध्ये ती ३५ टक्के जळाली असून तिची दृष्टी आणि वाचा जाण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

hinganaghat issue
हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

By

Published : Feb 4, 2020, 11:06 AM IST

Updated : Feb 4, 2020, 7:32 PM IST

वर्धा -हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलकांनी यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला हिंगणघाट येथील सहदिवाणी न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयात करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 8 फेबृवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण: पुढील 48 तास 'तिच्यासाठी' महत्वाचे

शाळेपासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हिंगणघाट तहसील कार्यालयाच्या दिशेने हा मोर्चा मार्गस्थ झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होते. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ आज वर्ध्यात सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळेला न्यायालयात केले हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपीच्या रिमांडसाठी पाच दिवसांची मागणी केली होती. त्यानंतर सहदिवाणी न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या न्यायालयाने 8 तारखेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीचे कोणीही वकीलपत्र न भरल्याने न्यायालयाने विधी सेवा प्राधिकारणातर्फे त्याला वकील पुरवला आहे. तर सरकारी वकील एस. डी. गावडे यांनी पीडितेची बाजू मांडली.

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

Last Updated : Feb 4, 2020, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details