वर्धा- वर्ध्यातील केळझरच्या जगदीश अंबागडे मृत्यू प्रकरणात दोघाना अटक करण्यात आली आहे. त्यांची हत्या दोन हजार रुपये हिसकावण्याच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. केळझरजवळ नागपूर-वर्धा महामार्गावर रस्त्याच्या कडेला दगडाने ठेचून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. सुनील उर्फ अशोक राऊत आणि दीपक ससाणे, असे मारेकऱ्यांची नावे आहेत.
केळझरला जगदीश हे रात्रीच्या सुमारास ढाब्यावर जात होते. वाटेत त्यांना सुनील राऊत आणि दीपक ससाणे हे दोघेही भेटले. त्यानंतर जगदीशला पैश्यांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. यात राऊत आणि ससाणे यांनी जगदीश जवळचे पैसे हिसकावून घेतले. ही गोष्ट कोणाला कळू नये, म्हणून जरदीशला चक्क रोडच्या खाली नेऊन त्याचा तोंडावर दगड टाकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी दोघेही घटनास्थळावरून दुचाकी घेऊन पसार झाले. ती दुचाकी नागपुरातून जप्त करण्यात आली आहे.
केळझर जगदीश अंबागडे मृत्यू प्रकरण: दोन हजार रुपयासाठी केला खून
वर्ध्यातील केळझरच्या जगदीश अंबागडे मृत्यू प्रकरणात दोघाना अटक करण्यात आली आहे. त्यांची हत्या दोन हजार रुपये हिसकावण्याच्या वादातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
केळझर जगदीश अंबागडे मृत्यू प्रकरण
सुनील राऊत हा डकेट म्हणून ओळखला जायचा. यापूर्वी त्याचा खुन आणि मारहाण प्रकरणात सहभाग होता. 2011 मध्ये एका हत्येत त्याचे नावही जोडले गेले होते. पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सुनील गाढे, उपनिरीक्षक सौरभ घरडे यांच्यासह पोलीस पथकाने आरोपीला अटक करण्यात महत्वाची कामगिरी बजावली.
Last Updated : Oct 10, 2020, 3:05 PM IST