महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुलवामा हल्ल्याविरोधात ठोस कारवाई व्हावी - बनवरीलाल पुरोहित - function

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान हुतात्मा झाले. त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळत आहे. यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे, अशीच प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे.

TAMIL

By

Published : Feb 16, 2019, 9:02 PM IST

वर्धा - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान हुतात्मा झाले. त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळत आहे. यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे, अशीच प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे. सहनशक्तीला सुद्धा एक सीमा असते, अशा शब्दात तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपली भावना व्यक्त केली. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर येथील हरीओम बाबा गोशाळेतील भक्त निवास आणि ज्ञान केंद्राच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते.

wardha

यावेळी राज्यपालांनी घडलेल्या घटनेबाबत देशातील वातावरण पाहता, सत्कार समारंभ करण्यास नकार दिला. केवळ दोन्ही वास्तूंचे लोकार्पण सोहळा साध्या पद्धतीने पार पडला. हे भक्तीचे ठिकाण आहे. हा श्रद्धेचा कार्यक्रम आहे.कपिला कामधेनूचे आपली जुनी संस्कृती आहे. त्याच्या सुरू असेलेल्या कामाबाबतही त्यांनी यावेळी कौतुक केले.

पूर्वी असे सांगितले जात असे की गोधनाशिवाय कुठले मोठे धन नाही, हिच आपली संस्कृती असल्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले. हरिओम बाबा गोशाळा ट्रस्टच्या वतीने लतातदेवी पुरोहित यांच्या स्मृती ज्ञान केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पुरोहोत परिवार जैसलमेर यांच्या वतीने भक्ती निवासाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लोकार्पण राज्यपाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी हरिओम बाबा ट्रस्टचे घनशाम पुरोहीत यांनीही श्रद्धांजली वाहत भावना व्यक्त केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details