महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या यात्रेचा मार्ग अशांततेने बदलला....! - 'जय जगत वैश्विक' यात्रा वर्ध्यात

जगभरातील अनेक देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जगातील गरिबी, हिंसा, प्रदूषण, असमानता या समस्यांवर बापूंच्या विचारांनी उपाय सुचवण्याची गरज आहे. जिनिव्हा सर्व जागतिक संघटनांचे कार्यालय असल्याने तिथे याबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.

जय जगत वैश्विक यात्रा
जय जगत वैश्विक यात्रा

By

Published : Jan 31, 2020, 12:42 PM IST

वर्धा -महात्मा गांधीजींच्या जयंतीचे 150 वे वर्ष असल्याने त्यांचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी 'जय जगत वैश्विक' यात्रा केली जात आहे. गांधी जयंतीच्या दिवशी चार महिन्यांपूर्वी या यात्रेला राजघाट येथून सुरवात झाली आहे. एकता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या या यात्रेचा पहिला टप्पा सेवाग्राम आश्रमात पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 10 देशातून मार्गाक्रमण करून जिनिव्हाला पोहचणार आहे. कायमच तणावात असलेले भारत-पाकिस्तान संबध 370 कलम रद्द केल्यापासून आणखी ताणले गेले आहेत. त्यामुळे जय जगत वैश्विक पदयात्रा पाकिस्तानमधून जाणार नाही.

गांधीजींचा संदेश जगभरात पोहचवण्यासाठी 'जय जगत वैश्विक' यात्रा


जगभरातील अनेक देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणमध्ये सुद्धा एक महिना या यात्रेचे नियोजन होते. मात्र, सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे यात बदल करण्यात आला आहे. काही मोजकेच लोक इराणला जाणार असल्याचे, एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजगोपाल यांनी सांगितले.

हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकपासून तयार केल्या विटा

एकता परिषदेचे संस्थापक डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्वाखालील ही पदयात्रा 10 देशात जाणार आहे. यात्रेदरम्यान 370 दिवसात 11 हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. या यात्रेत 10 देशांतील 50 जण सहभागी झाले आहेत. जगातील गरिबी, हिंसा, प्रदूषण, असमानता या समस्यांवर बापूंच्या विचारांनी उपाय सुचवण्याची गरज आहे. जिनीव्हा सर्व जागतिक संघटनांचे कार्यालय असल्याने तिथे याबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details