महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती - हिंगणघाट

इच्छुक उमेदवारांपैकी 4 नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यामधील कोणती नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

By

Published : Jul 29, 2019, 9:58 PM IST

वर्धा - हा जिल्हा इतिहासपूर्व काळापासून काँग्रेसचा गड राहिला होता. मात्र, आता काँग्रेसची अवस्था एकदम खराब झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीसाठी आर्वी विधानसभेसाठी कोणी अर्ज केला नाही, तर वर्धा विधानसभेसाठी आलेल्या 12 अर्जापैकी 4 जण मुलाखतीला गैरहजर होते. तर हिंगणघाट मतदारसंघातून एकही उमेदवार मुलाखतीसाठी आला नाही. त्यामुळे काँग्रेसवर भिंग घेऊन उमेदवार शोधण्याची वेळी येते की काय? असा सर्वांना प्रश्न पडत आहे.

वर्ध्यात काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

वर्धा विधानसभा मतदारसंघात इतर 3 मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक इच्छुक उमेदवार पाहायला मिळाले. देवळी आणि आर्वीला विद्यमान आमदार असल्याने त्या ठिकाणी कोणी अर्ज केला नाही. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी 2 उमेदवारांनी अर्ज भरला होता. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार मुलाखतीला आला नाही. वर्ध्याच्या काँग्रेस कार्यालय सद्भावना भवनात ही मुलाखत प्रक्रिया पार पडली.

तर या इच्छुक उमेदवारांपैकी 4 नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे. त्यामुळे यामधील कोणती नावे वरिष्ठ पातळीवर पाठविली जाणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अनेकदा चव्हाट्यावर आली आहे. मुलाखती दरम्यानही काही कार्यकर्त्यांकडून हाच प्रकार पुन्हा पाहायला मिळाला. काँग्रेसची परिस्थिती खिळखिळी झालेली असतानासुद्धा अंतर्गत कलह शांत होताना दिसत नाही. तर हिंगणघाट मतदारसंघ मागील काळात राष्ट्रवादीकडे असल्याने या ठिकाणी काँग्रेसचे पक्ष संघठण फारसे मजबूत नाही. त्यामुळेच या मतदारसंघासाठी कोणी मुलाखतीला आले नसल्याची चर्चा आहे.

काँग्रेसच्या या मुलाखतीसाठी मनीष शर्मा, पंकज गुड्डेवार, जिल्हा प्रभारी अनंतराव घारड, जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, आमदार रणजित कांबळे, अमर काळे, धनराज कुंभारे यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details