वर्धा : सध्या कोरोनाच्या काळात जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. यातही वर्धा जिल्ह्यात रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. यामुळे खबरदारी म्हणून शहरातील 6 खासगी डॉक्टर जे लगतच्या जिल्ह्यातसुद्धा सेवा देत असल्याने ये-जा करतात. यामुळे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी एक पत्र काढात डॉक्टरांनी रेडझोन जिल्ह्यातून होत असलेली ये-जा थांबवावी अशा सूचना एका पत्रातून दिल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात वैद्यकीय सेवा देणारे सहा डॉक्टर हे आठवड्यातील तीन ते चार दिवस आर्वी शहरात सेवा देतात. तर, बाकीचे दिवस हे लगतच्या जिल्ह्यामध्ये जाऊन वैद्यकीय सेवा देतात. लगतचे जिल्ह्यांमध्ये नागपूर असो की अमरावती हे रेडझोनमध्ये आहे. यामुळे आठवड्यातून एकदा त्यांना आर्वीमध्ये यावे लागते. बाहेर जिल्ह्यातून येताना नागरिकांना गृह विलगीकरणात ठेवण्यात येते. तेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना यात मुभा देण्यात आली आहे. पण सध्या शहरात आणि जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या पाहता डॉक्टरांचे ये-जा सुरू असल्याने भीतीचे वातावरण पाहता काही तक्रारी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांना प्राप्त झाल्या आहेत. यात दिलेल्या पत्रामध्ये तसा उल्लेखही करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या 6 डॉक्टरांनी एक तर कायमस्वरुपी आर्वी शहरातच वैद्यकीय सेवा द्यावी, अथवा ज्या जिल्ह्यात ते इच्छूक आहेत तेथेच सेवा द्यावी. पण खबरदारी म्हणून आठवड्याला ये-जा थांबवण्याची सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत.