वर्धा - देशातील सर्वोच्च संस्था असलेल्या आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांने वर्ध्यातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. बनावट फेसबूक प्रोफाईल बनवून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील मावलीकर असे गुन्हा दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
बनावट फेसबुक प्रोफाईल बनवून महिलेचा विनयभंग स्वप्नीलने वर्ध्यातील एक महिलेला तिचाच फोटो असलेल्या बनावट फेसबुक प्रोफाईलवरून अश्लील संदेश पाठवला. या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस आणि सायबर सेलकडून करण्यात आला.
वर्ध्यात राहणाऱ्या रामनगर पोलिसांकडे याबातची तक्रार दाखल झाली होती. यामध्ये तिचाच फोटो वापरत बनावट अकाऊंट बनवले. पीडित महिलेने स्वतःचा फोटो पाहून फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. नंतर मात्र तिला अश्लील संदेश येण्यास सुरुवात झाली. अत्याचार करण्याच्या धमक्या येऊ लागल्यात. काही दिवसांनी अश्लील व्हिडिओ आणि मेसेजला कंटाळून त्या महिलेने रामनगर पोलिसात तक्रार दिली. यानंतर पुन्हा दुसऱ्या एका बनावट अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. यातूनही तसेच मेसेज येत असल्याने रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चौधरी यांनी सायबर सेलला माहिती काढण्यास सांगितले.
फेसबुकला इमेल करून माहिती मिळवण्यात आली. यात आयआयटी दिल्लीच्या कॅम्पसमधून एका विद्यार्थ्याने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. स्वप्नील मालविकर असे गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सायबर सेलचे कुलदीप टांकसाळे यांनी गुन्हा दाखल असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या विद्यार्थ्याची पोलिसांनी चौकशी केली. पीडित महिलेचा फोटो पहिल्यानंतर तिच्यावर प्रेम झाले. यातून त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले.
टेक्निकली तपास यंत्रणेचा लागला कस !
आयआयटी दिल्लीत जेव्हा तपास यंत्रणा पोहोचली तेव्हा मात्र चांगलाच कस लागला. हजारो विद्यार्थ्यांमधून एकाला शोधणे तसेच नावाजलेल्या संस्थेतील विद्यार्थ्याला ताब्यात घेण्याचे कठीण काम होते. यासाठी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांचे दिल्लीच्या पोलिसांशी सतत संवाद साधला.
फेसबुकवर महिलांनी अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद देऊ नये......
अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट महिलांनी स्वीकारू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना केले.