वर्धा- विदर्भासह वर्ध्यात पहिल्याच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे मतमोजणीला उमेदवारांसह मतदारांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. आता ही प्रतीक्षा संपणार आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीला अवघे काही तासच आता शिल्लक राहिले आहे. दरम्यान, मत मोजणीपूर्वी या एक्झिट पोलबद्दल काँग्रेस आणि भाजप यांना काय वाटते हे ईटीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
एक्झिट पोलबद्दल विदर्भातील काँग्रेस-भाजपला काय वाटते?
मत मोजणीपूर्वी या एक्झिट पोलबद्दल काँग्रेस आणि भाजप यांना काय वाटते हे ईटीव्हीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेसला हा एक्झिट पोल मान्य नाही. ग्रामीण भागात शेतकरी तसेच जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे पोलमध्ये निवडणून येणाऱ्या जागा या वास्तविक परिस्थितीला धरून नाही. त्यामुके हा एक्झिट पोलएवजी 23 मेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. वर्ध्यातील काँग्रेसचा उमेदवार हा कमीत कमी 50 हजार मताधिक्यांनी निवडून येईल, असा अंदाज असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी ईटीव्हीसोबत बोलताना सांगितले.
एक्झिट पोलवर भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार असून मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचा दावा केला. त्यांनी मागील काळात केलेल्या कामांचा हा विजय असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे यंदा राज्यात मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडणून येतील. शिवाय विदर्भात 10 पैकी 10 जागा येतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.