वर्धा- वर्ध्याच्या कारला चौकातील पवनसुत पेट्रोलपंप व्यवस्थापकास मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पेट्रोल भरतांना मास्क न लावण्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली. त्यानंतर पुन्हा चिल्लर पैशाच्या कारणावरून झालेल्या वादवादीत दुचाकी चालकाने बाहेरून काहींना बोलावून मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या मारहाणीची तक्रार रामनगर पोलिसात केली आहे.
पेट्रोलपंप व्यवस्थापकास मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद - wardha police
पेट्रोल भरतांना मास्क न लावण्याच्या कारणावरून वादाला सुरुवात झाली.
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत कारला येथील पेट्रोलपंपवर दुचाकी धारक पेट्रोल भरण्यासाठी गेला. यावेळी मास्क न घातल्याने पेट्रोलपंपवरील एकाने हटकल्याने वादाला सुरुवात झाली. मास्क लावून पेट्रोल भरले असताना 500 रुपयाची नोट दिली. यावरून पुन्हा चिल्लर नसल्याचे सांगताच पुन्हा वाद झाला. यावेळी शिवीगाळ करण्यात आली. यावेळी पेट्रोलपंप व्यवस्थापक मंगेश मेश्राम यांना दुचाकी धारकाने काहींना बाहेरून बोलावून मारहाण केली. हाताबुक्याने मारहाण केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. यानंतर त्या जखमी व्यवस्थपकास रुग्णालयात नेत उपचार केले. यानंतर रामनगर पोलिसात जाऊन गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.