वर्धा- जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. विकृतीचा कळस असणारी ही घटना सोमवारी शहरात घडली. पीडिता आणि आरोपी दोघेही एकाच गावाचे असल्याने त्याच गावातली नागरिकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी या दोघांना लहानाचे मोठे होताना पाहिले, त्या गावकऱ्यांनी या घटनेविषयी आपली मत व्यक्त केले आहे.
आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे; हिंगणघाटच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया - गुन्हे
पीडिता आणि आरोपी एकाच गावातील आहेत. त्या दोघांनाही लहानाचे मोठे होताना पाहणाऱ्या स्थानिकांनी या घटनेबद्दल उद्विग्न प्रतिक्रिया दिल्या. आरोपीला शिक्षा तर व्हावी मात्र, महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंगणघाटचे नागरिक
गावाच्या लेकीने अभ्यासात नाव कमावले. तर दुसरीकडे गावातल्याच मुलाने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वेदना सहन करत ती मृत्यूशी झुंज देत आहे. गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - नांदेड : शिक्षकाकडून अश्लील चित्रफीत दाखून तिसरीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार