महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेतून 30 विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला; विद्यार्थी वाऱ्यावर - mangeshi moon

रोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून उमेद प्रकल्पांतर्गत वसतिगृहातील ३० विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला आहे. याविरूद्ध उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांनी जिल्हा परिषदेपुढे मुलांना घेऊन ठिय्या देत मुख्यध्यापकावर कारवाईची मागणी केली.

विद्यार्थी

By

Published : Jul 6, 2019, 8:48 AM IST

वर्धा- रोठा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून उमेद प्रकल्पांतर्गत वसतिगृहातील ३० विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला देण्यात आला आहे. हा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिल्याने त्यांच्यावर विद्यार्थ्यांना शाळा बाह्य ठेवण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांनी जिल्हा परिषदेपुढे मुलांना घेऊन ठिय्या देत मुख्यध्यापकावर कारवाईची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेतून 30 विद्यार्थ्यांना दाखले दिल्याचा मुख्यध्यापकावर आरोप


रोठा गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेपासून काही अंतरावर उमेद प्रकल्पांतर्गत पारधी भटक्या समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह चालविले जाते. हे वसतिगृह विना अनुदानित असून यात पूर्णतः भटक्या समाजाच्या मुलांचे संगोपन केले जाते. जवळच शाळा असल्याने मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देऊन पाठविले जाते. मात्र, या वर्षीच्या सत्रात शाळेतील तब्बल ३० मुलांना जबरदस्तीने दाखले देऊन काढून टाकण्यात आले. याविरोधात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.


यात शाळेचे मुख्यध्यापक महाकाळकर यांच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले आहे. शाळेत मुलांना दुय्यम वागणूक देणे, विद्यार्थ्यांवर चोरी सारखे गंभीर आरोप लावणे, विद्यार्यांकडून चुकीची कामे करून घेणे, असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहे. तसेच, केवळ तीन अर्जांवर ३० मुलांना दाखले कसे दिले. याचे उत्तर त्यांना मागण्यात येत आहे.


याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रकरणाची गंभीरता पाहता शाळेला भेट देत पाहणी केली. तसेच प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी आष्टी येथील गट शिक्षण अधिकारी करतील. ते संपूर्ण बाबी तपासून मत जाणून घेऊन अहवाल सादर करतील. त्यांनतर दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. यात कुठलीही हयगय होणार नसल्याचे ओंबासे यांना सांगितले.


याप्रकरणी उमेद प्रकल्पाच्या संचालिका मंगेशी मुन यांना शाळेत चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. मात्र, मंगेशी मुन आल्या नाही. त्यांनी अजून लेखी तक्रारही दिली नाही. लवकरच अहवाल प्राप्त होणार असून दोषींवर कारवाई केल्याजाणार असल्याचे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. ओंबासे यांनी संगीतले आहे. या प्रकरणामुळे विद्यार्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी लवकर शाळेत प्रवेश घ्यावा. असे आवाहनी डॉ. ओंबासे यांच्याकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details