वर्धा- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांचा प्रचारार्थ आज कारंज्यातील जुन्या बाजार चौकात सभा पार पडली. यावेळी सभेला वेळेपेक्षा तब्बल २ तास उशिरा येण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हेलिकॉप्टरचे तांत्रिक कारण पुढे करत सभेला वेळेवर येऊ दिले नाही, असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला. यानंतर त्यांनी विदर्भातील नेत्यांसह भाजपवर टीका केली.
प्रचार सभेत बोलताना मंत्री हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे सभेला ११ वाजता येणार होते. मात्र, ते वेळेवर येऊ न शकण्यामागे हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मुंबई, दिल्लीला फोन लावावा लागला. तब्बल २ तासांनी परवानगी मिळाल्याने यायला उशीर झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विदर्भातील जनतेचा विकास केला नसल्याचेही ते म्हणाले.
राम कदम प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात महिला काँग्रेसच्या चारुलता टोकस यांनीच पुढाकार घेतला. त्यावेळी सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कालांतराने उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पण कदम यांना पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही. अशा प्रकारे सत्तेत असल्याचा फायदा घेत असल्याचे टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री, अर्थमंत्री, केंद्रीय मंत्री विदर्भातील आहेत. विदर्भाने भाजपला एकहाती सत्ता दिली. जवळजवळ आमदार महानगर पालीला आदी भाजपच्या ताब्यात आहे. पण विदर्भाचा विकास झाला नाही. नागपुरात मेट्रो आली. पण त्यातून ५ टक्केच लोक प्रवास करतात. मेट्रोची गरज ४० वर्षांनी आहे. विदर्भाचा विकास मूठभर लोकांकरिताच झाला, असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार अमर काळे, उमेदवार चारूलता टोकस, मेघराज चौधरी, नगराध्यक्ष कल्पना मस्के, बेबी कठाने, टीका राम घागरे आदी उपस्थित होते.