महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

78 वर्षीय सेवानिवृत्त गुरुजींची दारूबंदीसाठी वीरुगिरी; मात्र, त्यांच्यावरच कारवाई - Babanrao Dabhane Guruji News

- वयाच्या अठ्यात्तरीत गुरुजींची दारूबंदीसाठी विरुगिरी - पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - गुरुजींचा सेवानिवृत्तीपासून दारूबंदीसाठी लढा - मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू - गावातील अवैध धंदे बंद करण्याचे मागणी - कोविडचे कारण पुढे करत गुन्हा दाखल

वयाच्या अठ्ठ्यात्तरीत गुरुजींची दारूबंदीसाठी विरुगिरी
वयाच्या अठ्ठ्यात्तरीत गुरुजींची दारूबंदीसाठी विरुगिरी

By

Published : Aug 8, 2020, 9:39 PM IST

वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील 78 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने अनोखे आंदोलन केले. गावातील अवैध धंदे बंद व्हावे आणि दारूबंदी यासाठी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी करत आंदोलन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या 78 वर्षीय गुरुजींचे आंदोलन चांगलेच चर्चेत आले. बबनराव दाभणे असे या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. गुरुजी अशीच त्यांची ओळख आहे.

क्रांती दिनाच्या औचित्याने गुरुजी दाभणे यांनी शनिवारी गिरड येथील पिण्याच्या पाण्यावर टाकीवर चढून आंदोलन केले. दारूबंदीसाठी अनेक वर्षांपासून ते लढा देत आहेत. मागील तीन महिन्यांपूर्वी त्यांनी आंदोलन करून गावातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. पण याकडे लक्ष न दिल्याने आणि लॉकडाऊन असल्याने प्रश्न मागे पडला.

आज केलेल्या आंदोलनाने अनेकांचे लक्ष वेधले. यावेळी पोलीस प्रशासनाकडून दारूविक्रेत्याविरुध्द थातूरमातूर कारवाई केली असल्याचा आरोप केला. यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. किमान सहा महिने त्यांना जामीन देऊ नये. आर्थिक भुर्दंड म्हणून पन्नास हजारपर्यंत दंड द्यावा. पोलीस ठाण्यात दारूबंदी पथक स्थापन करावे. दारूविकेत्यांकडून पकडलेली दारू लागलीच नष्ट करावी, दारूबंदी महिला मंडळांना संरक्षण द्यावे, अशी मागणी गुरुजींनी केली.

गिरड पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेंद्र सूर्यवंशी यांच्याशी झालेल्या चर्चेअंती अवैध व्यावसायिकांवर कारवाईचे आश्वासन गिरड पोलिसांनी दिले. त्यानंतर ते खाली उतरले. कोरोनामुळे जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने विना परवानगी आंदोलन करू नये, असा आदेश आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्याने बबनराव दाभणे यांच्यावर गिरड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच पद्धतीने परवानगी नसताना सुरू असलेल्या अवैध व्यवसायिकांवर कडक नियम लावल्यास आणि कठोर कारवाई केल्यास पोलिसांनी कर्तव्य बजावले, असे म्हणता येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details