वर्धा -हिंगणगाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. शोकाकूल वातावरणात तिच्यावर आज अत्यसंस्कार करण्यात आले. यासंबधी शासनाने दिलेले लेखी आश्वासन आणि मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच कायद्यात बदल करुन असा गुन्हा करणाऱ्यांना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी, असे मत पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केले आहे. तसेच शासनाने माझ्या मुलीला त्वरीत न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हिंगणघाट प्रकरण : हैदराबाद प्रमाणे कारवाई करून माझ्या मुलीला न्याय द्या.. - शासनाने माझ्या मुलीला त्वरीत न्या द्यावा
हिंगणगाट जळीतकांडातील पीडित तरुणीची अखेर मृत्यूशी झुंज संपली आहे. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. शोकाकूल वातावरणात तिच्यावर आज अत्यसंस्कार करण्यात आले. यासंबधी शासनाने दिलेले लेखी आश्वासन आणि मागण्या पूर्ण कराव्यात. तसेच कायद्यात बदल करुन असा गुन्हा करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी असे मत पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.
पीडीतेचे वडील
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.