वर्धा - सध्या कोरोना विषाणूच्या रुग्णासंख्येत वाढ होत आहे. यात राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून आता लोकांनी घरात राहणे गरजेचे आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडताना गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाणे टाळा, असे प्रशानसनातर्फे आवाहन केले जात असताना वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठेत मुलांनी हट्ट केला म्हणून त्यांनाही सोबत आणल्याचे प्रकार होत आहेत. मुलांच्या हट्टापायी जरी त्यांना भाजीबाजारात आणले असले तरी ते धोक्याचे ठरणारे आहे.
लहान मुलांसोबत भाजी खरेदीस येणे धोक्याचे; गर्दीची ठिकाणे टाळा - कोरना दक्षता
सध्या जीवनावश्यक वस्तूमध्ये भाजीपाला मोडत असला तरी गर्दी करणे टाळा, असे आवाहन केले जात आहे. मोठ्या प्रमााणात भाजी बाजारात होणारी गर्दी टाळा असे सांगूनसुद्धा लोक गर्दी करत आहेत. लहान मुलांनी हट्ट केला म्हणून आणले असल्याचे कारण नागरिक देत आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
हेही वाचा -वर्ध्यात पोलीस प्रशासनाकडून संचारबंदी लागू..