महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सावंगी रुग्णालयात कन्या दिवस साजरा - Savangi Hospital

कार्यक्रमाची सुरुवात लेक वाचवा या जनजागृती करणाऱ्या रॅलीपासून करण्यात आली. वैदकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनी हातात पोस्टर आणि फलक घेत लेक वाचवा असा संदेश  रॅलीतून दिला. या कार्यक्रमात मुलींचा घटता जन्मदर आणि त्याचा वर्तमानकाळात व भविष्यात होणारा परिणाम याबाबत डॉ . स्वर्णलता सामल, डॉ . संध्या पजई यांनी माहिती सादर केली.

सावंगी रुग्णालयात कन्या दिवस साजरा

By

Published : Jul 5, 2019, 4:44 AM IST

वर्धा -दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय गायनेकोलॉजीकल सोसायटीच्या देवळी सावंगी शाखेद्वारे सावंगी रुग्णालयात 'कन्या दिवस' साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त स्त्रीरोग व प्रसूती विभागाद्वारे विविध सामाजिक उपक्रम, स्पर्धा आणि बेटी बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सावंगी रुग्णालयात कन्या दिवस साजरा

कार्यक्रमाची सुरुवात लेक वाचवा या जनजागृती करणाऱ्या रॅलीपासून करण्यात आली. वैदकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीनी हातात पोस्टर आणि फलक घेत लेक वाचवा असा संदेश रॅलीतून दिला. या कार्यक्रमात मुलींचा घटता जन्मदर आणि त्याचा वर्तमानकाळात व भविष्यात होणारा परिणाम याबाबत डॉ . स्वर्णलता सामल, डॉ . संध्या पजई यांनी माहिती सादर केली. कन्या दिनानिमित्त ' बेटी बचाओ ' या विषयावर पोस्टर, वादविवाद रांगोळी अश्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण जिल्हा परिषदेचे सीईओ सचिन ओंबासे यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

या रॅलीत शिक्षकांसोबतच विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर जया जैन, गीतांजली बुलानी, स्नेहा इंगळे तसेच स्त्रीरोग व प्रसूती विभाग आणि महाविद्यालयातील सर्वांनी सहभाग नोंदवला.

ABOUT THE AUTHOR

...view details