नागपूर- पैशाच्या मोहापायी लोक कुठल्या थराला जाईल याचा नेम नाही. वर्धा जिल्ह्यातही पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करत गुप्तधनासाठी युवतीचा शारीरिक, मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेपोटी यात पीडितेसोबत घृणास्पद कृत्य करण्यात आल्याचे समोर आले आहे. पीडित युवतीच्या आईनेही या अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी पीडितेचा एक नातलग व बाळू मंगरूटकर या दोघांना अटक केली आहे.
एकीकडे पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेताना समाजात मात्र, अंधश्रद्धा अजून दूर झालेली नाही. पैशाचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेतून युवतीचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अघोरी पूजा करून लाख, दोन लाख नव्हे तब्बल 80 कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचा दावा मांत्रिकाने केला होता. यासाठी पीडितेला निर्वस्त्र करत घृणास्पद प्रकार करण्यात आला.
पीडितेच्या आईला पैशांचे आमिष
पीडितेची आई एका दुकानात काम करत होती. तिथे ओळख झालेल्या महिलेने तिला मुलीची पूजा करत पैशाचा पाऊस पाडणारा मांत्रिक असल्याचे सांगितले. तिथून छळाला सुरूवात झाली. पैसे मिळणार या आमिषाला बळी पडलेल्या पीडितेच्या आईनेही या अघोरी कृत्याला मंजूरी दिली. पीडितेच्या शरीरात मुंजा म्हणजेच अतृप्त आत्मा सोडून हा पैशाचा पाऊस पडण्याचा दावा आमिष मांत्रिकाकडून करण्यात आला. यात 80 कोटी रुपये पाडण्याचे अमिष दाखवत वर्षभर पीडितेसोबत घृषास्पद कृत्य करण्यात आले.
हेही वाचा -काविळसाठी तयार केले औषध, कोरोनावर ठरले गुणकारी, वाचा "रेमडेसिवीर" विषयी सबकुछ
पीडिता पळून गेल्याने प्रकार उघडकीस