वर्धा -आतापर्यंत पाहिलेले वाद युती होताच विसरल्या गेले आहेत. सेना भाजपमध्ये कधीच कुरबूर नसते. सेना भाजपचे गाणे आहे, 'ये दोस्ती हम नही तोडेंगे', 'तेरी जीत, मेरी जीत, तेरी हार, मेरी हार, ऐसा अपना प्यार'. अशा शब्दात राज्याच्या अर्थमंत्र्यांनी युतीत सर्व काही ठीक ठाक असल्याचे सांगितले आहे. ते वर्ध्यात लोकसभा पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांनी न्यू आर्ट कॉलेजकमध्ये आयोजित बैठकीनंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
'ये दोस्ती हम नही तोडेंगे', सेना-भाजपमधील कुरबूर संपली - मुनगंटीवार
राजकीय पक्ष असतात, कधीकाळी भाष्य होते कधी मतभेद होतात. पण दोन्ही पक्षाचे वैशिष्ट्य आहे, एक सूर एक विचार, एक मिशन आणि एक लक्ष्य. हे मिशन भारतमातेच्या विजयाचे आणि वैभवाचे आहे. सत्तेचा मोह महायुतीने कधी केला नाही, आम्ही सेकंदात गाडीवरील लाल दिवे काढले.
राजकीय पक्ष असतात, कधीकाळी भाष्य होते कधी मतभेद होतात. पण दोन्ही पक्षाचे वैशिष्ट्य आहे, एक सूर एक विचार, एक मिशन आणि एक लक्ष्य. हे मिशन भारतमातेच्या विजयाचे आणि वैभवाचे आहे. सत्तेचा मोह महायुतीने कधी केला नाही, आम्ही सेकंदात गाडीवरील लाल दिवे काढले. कारण नेत्यांनी लाल दिव्यांवर प्रेम करणे आम्हाला शिकवले नाही.
यावेळी काँग्रेसच्या वार्षिक ७२ हजार रुपये देण्याच्या घोषणेची त्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ते म्हणाले, देशात शांततेसाठी नोबेल पुरस्कार दिला जातो. जर खोटं बोलण्यासाठी गुडेल्स पुरस्कार दिला तर याचा पहिला मान काँग्रेसच्या नेत्यानाच मीळेल.
यावेळी पक्षीय बैठका घेतल्या गेल्या. या बैठकांच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयरी केली जात आहे. यावेळी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष अतुल तराळे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी होते.