वर्धा - ज्वारीची फुटवा खाल्ल्याने गाईंना विषबाधा झाल्याची घटना तळेगांव शामजीपंत येथील पाचपावली पांधन शिवारात घडली. यामध्ये १५ गाईंचा मृत्यू असून, काही गायींची प्रकृती गंभीर आहे.
ज्वारीची फुटवा खाल्ल्याने १५ गाईंचा मृत्यू - pachpavali
ज्वारीची फुटवा खाल्ल्याने गाईंना विषबाधा झाल्याची घटना तळेगांव शामजीपंत येथील पाचपावली पांधन शिवारात घडली. यामध्ये १५ गाईंचा मृत्यू झाला आहे.
गावात मोरेश्वर मुरके हा गुराखी गाई चारण्यासाठी घेऊन गेला होता. पाचपावली पांधन शिवारातील दुर्गेंच्या शेतात गाई चरत होत्या. यावेळी अचानक एका मागून एक गाय जमिनीवर लोळताना दिसली. जवळ जाऊन पाहिले असता गायींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.
ग्रामस्थांनी तत्काळ सरकारी पशुवैदकीय दवाखान्यातील डॉक्टरांना माहिती देत घटनास्थळी आणले. यावेळी तपासणी करत उपचाराला सुरवात केली. मात्र, तोपर्यंत १५ गाईचा मृत्यू झाला होता. कळपात एकूण २२ गाई होत्या. उर्वरित गाईंची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.