वर्धा -जिल्ह्याच्या काही भागाला बुधवारी आलेल्या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. विद्युत खांब जमिनीवर आडवे झाले तर काही ठिकाणी विद्युत तारा जामिनावर तुटून पडल्या आहेत. यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढण्याची वेळ आली. वितरण कंपणीचेही मोठे नुकसान या वादळात झाले.
सात गावांचा विद्युत पुरवठा खंडित, रात्र अंधारात
जिल्ह्याच्या काही भागाला बुधवारी आलेल्या वादळाचा जोरदार तडाखा बसला. विद्युत खांब जमिनीवर आडवे झाले तर विद्युत तारा जामिनावर तुटून पडल्याने सात गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला.
वीज तारा तुटल्यानं सात गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. बुधवारी सायंकाळी वायफड शिवारात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. यावेळी गाराही पडल्या. गावातील वीज तारा तुटल्यानं तसच मुख्य लाईनच्या ताराही झाड पडून तुटल्यानं वीज पुरवठा बंद खंडित झाला आहे. यात वायफड, लोणसावळी, वाठोडा, डोरली, धामणगाव, आंबोडा, आमला गावांचा वीज पुरवठा रात्रभरापासून बंद आहे. घरासमोर विद्युत तारा लोंबकळल्या आहे. याचाही त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
वायफड, लोणसावळी, रसुलाबाद येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. डोरली येथे कुक्कुटपालनचे शेड उडाले. यात हजारांच्या आसपास पक्ष्यांचा मृत्यू झाला. नव्यानेच सुरू केलेला व्यवसाय वादळाने मोडला असल्याने व्यावसायिकाचे आर्थिक कंबरडे मोडले. आता या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या ठिकाणी विद्युत लाईन दुरुस्त करण्याचे काम सुरू झाल्याचे सांगीतले जात आहे.