महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूने केला बाप लेकाचा घात; वडिलांचा मृत्यू, मुलगा खुनाच्या आरोपात गजाआड - पुलगाव पोलीस स्टेशन

वर्धा जिल्ह्यातील गुंजखेडा येथे पोटच्या मुलाने दारूच्या नशेत वडिलांचा खून केला.

प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Sep 20, 2019, 8:52 PM IST

Updated : Sep 21, 2019, 6:12 AM IST

वर्धा - पोटच्या मुलाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना गुंजखेडा गावात घडली. या घटनेप्रकरणी मुलाच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील गुंजखेडा येथे पोटच्या मुलाने दारूच्या नशेत वडिलांचा खून केला.

हेही वाचा -बीड खून प्रकरण : गुडांना अटक करा, अन्यथा स्वत:ला संपवू; मृताच्या नातेवाईकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

प्रल्हाद घांगळे (60) असे मृताचे नाव असून प्रदीप घांगळे आरोपी मुलाचे नाव आहे. हे दोघेही बाप-लेक व्यसनी होते. ते नेहमी एकमेकांना शिवीगाळ करत. त्यामुळे दोघांच्यात वारंवार वाद होत होता. मात्र, गुरुवारी वडील दारू पिऊन आले आणि त्यांनी मुलाला काहीतरी काम धंदा कर असे म्हणून शिवीगाळ केली. यानंतर मुलाने दारूच्या नशेत वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जिल्ह्याच्या पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गुंजखेडा येथे घडली.

हेही वाचा -मित्राने बायकोसोबत व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रिनशॉट दाखवल्याने पत्नीचा गळा आवळून खून

घटनेची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी आईच्या जबाबावरुन वडिलांच्या हत्येचा गुन्हा मुलावर दाखल झाला. यात आरोपी मुलाला अटक केली असून, पुढील चौकशी पीएसआय अमोल कोल्हे करत आहे.

Last Updated : Sep 21, 2019, 6:12 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details