वर्धा -आनंदवन हे समाजकार्यात असणारे मोठे नाव आहे. यात बाबा आमटे यांच्या नातीने आज आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शीतल आमटे करजगी यांनी घेतलेले कठोर पाऊल अनेकाना धक्का देणारे ठरले. स्पष्ट परखड मत व्यक्त करणाऱ्या शीतल यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने घेतलेला निर्णय नक्कीच धक्कादायकच असल्याचे मत वर्ध्याचे पीपल्स फॉर अॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी व्यक्त केले.
डॉ. शीतल आमटेना मागील वीस वर्षापासून पाहात आहे. शीतल यांच्याशी पहिली भेट ही सोमनाथ शिबीर म्हणजे, बाबा आमटे यांच्या श्रम संस्कार शिबिरात असताना झाली होती. या शिबिरात महाराष्ट्रभरातून अनेकांनी समाजकार्याचे धडे घेतले आहे. याच शिबिरातून आम्ही घडलो, डॉ. शीतल घडल्या. त्यांचे एखाद्या बाबीवर बोलताना परखड मत असायचे. काम करताना गांभीर्याने विषय समजून घेत पाऊल टाकनारा त्यांचा स्वभाव होता. अशा व्यक्तीने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे गोस्वामी यांनी सांगितले.
समस्यांचे निराकरण झाले असते..